माझ्या विषयी
- - माझ्या विषयी
३३ वर्षाची राज्य शासनाच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाची प्रदिर्घ सेवा केल्यानंतर मी २०१३ मध्ये सेवानिवृत्त झालो.लगेच मला राज्याच्या पणन मंडळात किमान आधारभूत किंमत योजनेच्या यशस्वी अमलबजावणी साठी तत्कालीन पणन मंत्री महोदयांनी मला नियुक्ति दिली.किमान आधारभूत किंमत योजनेच्या यशस्वी अलबजावणीसाठी मला कठोर परिश्रम करावे लागले.पणन मंडळातील माझ्या दोन वर्षाच्या सेवा कालावधीत किमान आधारभूत किंमत योजनेची यशस्वी अलबजावणी करुन राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देउ शकलो याचे समाधान आहे.यावर्षी किमान आधारभूत किंमत योजनेची नियोजनशुन्य अलबजावणीने राज्यात तूर,सोयाबीन व कापूस खरेदीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पणन विषयक प्रश्न, सहकार विभागा विषयीचे प्रश्न ,सावकारी कायद्याची ढीसाळपणे होत असलेली अमलबजावणी(कांही अपवाद वगळता) याबाबत राज्यातील दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे कात्रण संकलीत करुन मी सर्व संबंधीतांना व शासनाकडे ई-मेल,फेसबुक,व्हाट्सअप,च्या माध्यमाद्वारे शिघ्रतेने पाठवीतो.माझा त्यामागील उद्देश केवळ हाच राहील की राज्याच्या समस्याग्रस्त शेतकरी बांधवास तात्काळ न्याय मिळावा.आज शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक हितकारक योजना अस्तीत्वात आहेत परंतू प्रत्यक्ष शेतकरी बांधवापर्यंत योजना पोहचण्यात अनेक अडचणी आहेत,शेतकरी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कांही अंशी माझे प्रयत्न कामी आल्यास त्याचे सार्थक होईल.
शेषराव चव्हाण
सेवानिवृत्त सह निबंधक,सहकारी संस्था
महाराष्ट्र राज्य,पुणे
मोबाईल:9423567409
www.shesharao.com
Comments
Post a Comment